Latest Marathi News
Ganesh J GIF

माxxxxx संजय राऊत तू यापुढे अशी भाषा….

शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांची संजय राऊतांना शिवी, वाद पेटणार?

बुलढाणा दि २(प्रतिनिधी)- ठाकरे आणि शिंदे गटात नेहमीच शाब्दिक वादावादी होत असते. पण अलीकडे शिंदे गटातील आमदार थेट शिव्या देऊ लागले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने निर्माण झालेला वाद थांबतनाही तोवर आमदार संजय गायकवाड यांची जीभ चांगलीच घसरली आहे. गायकवाड यांनी थेट संजय राऊत यांना शिवी दिली आहे.

संजय राऊतांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असे कोरलं होते, तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असं कोरलं आहे, याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, अशी जळजळीत टिका राऊत यांनी केली. त्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी थेट राऊतांना शिवी दिली.संजय गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे माxxxx संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू असे आव्हान दिले आहे.

मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांनी टीका करत असताना शिवराळ भाषा वापरण्याचा सपाटाच लावला आहे. यामुळे राजकारणाची पातळी खालावल्याची खंत देखील व्यक्त करण्यात येत आहे. गायकवाड यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!