Just another WordPress site

प्रेमविवाहासाठी तरूणीने केला भयानक कट

दिल्लीत मिसिंग गर्लची मिस्ट्री, बघा नेमका प्रकार काय

दिल्ली दि १(प्रतिनिधी) – प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरुणीने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना नोएडात उघडकीस आली आहे. एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना तरुणीचा बनाव उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकरासह चार लोकांना अटक केली आहे.चित्रपटाला लाजवेल असा कट त्यांनी रचला होता पण अखेर त्यांना बेड्या पडल्या आहेत

GIF Advt

पायल असे तरुणीचे आणि अजय असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि पायलचे प्रेमसंबंध होते. पण पायलच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. घरचे तिच्यासाठी स्थळ शोधत होते. त्यामुळे अजय आणि पायलने एक कट रचला.यासाठी पायल आणि अजयने पायलसारख्या दिसणाऱ्या मुलीचा शोध घेतला. त्यानंतर त्या तरुणीची हत्या केली. चेहरा ओळखता येऊ नये म्हणून चेहऱ्यावर अॅसिड टाकले. त्यानंतर मृतदेहाला पायलचे कपडे घातले. आणि एक सुसाईड नोट लिहीत आपल्याला जगण्याची इच्छा नाही, त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले. त्यानंतर पोलीसांनी सुसाईड नोटवरुन मृतदेह पायलचा कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. त्यानंतर हेमलता नावाची तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली तिचा शोध घेत असताना अजयचा नंबर त्यांना मिळाला पोलीसांनी अजयला पोलीसी खाक्या दाखवताच सगळा प्रकार समोर आला.

पोलिसांनी अजयला ताब्यात चौकशी केली असता पोलीस पायलपर्यंत पोहचले.पायलची चौकशी केली असता तिने सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी पायल आणि अजयसह चौघांना अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!