Just another WordPress site

खासदार अभिनेत्रीची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी

राजकारणातील फटकेबाजीनंतर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

अमरावती दि ४(प्रतिनिधी)- राजकारणाच्या मैदानात राष्ट्रवादीच्या मदतीने लोकसभेत पोहोचलेल्या पण भाजपाला साथ देत सतत ठाकरे गटावर हनुमान चालीसा घेऊन टीकेची फटकेबाजी करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी केली.


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानाबाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणापासुच जास्तच चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा अमरावती शहरात असलेल्या वेलनेस सेंटरच्या उटघाटनासाठी आल्या होत्या.याच ठिकाणी अंबिका नगरमध्ये काही तरुण क्रिकेट खेळत होते. यादरम्यान खासदार नवनीत राणा यांचे लक्ष क्रिकेट खेळत असलेल्या मुलांकडे गेले. यानंतर खासदार नवनीत राणांनीही त्या मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरूवात केली. यावेळी त्यांनी शानदार फलंदाजी केली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नवनीत राणा यांचे व्हिडिओ सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होत असतात.

GIF Advt

नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरोधात हनुमान चालिसा प्रकरणी वॉरंट निघाले आहे. या वॉरंटनुसार १४ तारखेपर्यंत राणा दांपत्याला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. नेहमी ठाकरेंवर टिका करणाऱ्या राणांनी दोन दिवसापूंर्वी मात्र उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले होते. पण सध्या नवनीत राणांच्या राजकीय फटकेबाजी पेक्षा क्रिकेटची फटकेबाजी व्हायरल झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!