Latest Marathi News
Ganesh J GIF

लाखो फाॅलोअर्स असलेल्या सोशल मिडीया स्टारचे अकाली निधन

सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टमुळं तिच्या हजारो चाहत्यांना धक्का

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर स्टार कॅनडा येथील मूळ भारतीय असलेली मेघा ठाकुर हिचे केवळ २१ व्या वर्षी निधन झाले आहे. मेघा ठाकुर ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टिक टॉक स्टार होती. तिचे ९३ हजार फॉलोअर्स होते. ती फॅशन, बॉडी पॉझिटिव्हिटी अशा विषयांवर व्हिडिओ बनवत होती.

मेघा ठाकूरच्या आई-वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या निधनाची माहिती दिली आहे. २४ नोव्हेंबर रोजी मेघाचा मृत्यू झाला. वयाच्या २१व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. मेघाच्या आई-वडिलांनी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मेघाचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाल्याची माहिती दिली. मेघा ही २१ वर्षांची होती. तिच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहत आहेत. मेघाचे टिकटॉकवर ९ लाख ३० हजार फॉलोअर्स होते. मेघा अनेकदा तिच्या नृत्यांचे व्हिडीओ शेअर करायची.  ‘आमच्या आयुष्यातला प्रकाश, आमची मायाळू आणि सुंदर मुलगी मेघाचा २४ नोव्हेंबरच्या सकाळी अचानक आणि अनपेक्षित मृत्यू झाला. जड अंतकरणानं आम्ही तिच्या निधनाचं वृत्त जाहीर करत आहोत,’ असं तिच्या पालकांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केलं आहे. मेघाच्या अकाली निधनानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

मेघा वर्षाची असताना तिचे आई वडील कॅनडात स्थलांतरित झाले. २०१९ मध्ये मेफील्ड सेकंडरी स्कूलमधून उत्तीर्ण झाल्यानंतर मेघानं वेस्टर्न विद्यापीठात प्रवेश घेतला. पदवीसाठी प्रवेश घेतल्यानंतर तिनं टिकटॉकवर पदार्पण केलं. मेघा इन्स्टाग्रामवरदेखील लोकप्रिय होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!