Just another WordPress site

खासदार उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये गायले गाणे

चाहत्यांचा हट्ट उदयनराजेंनी पुरवला, लतादिदिंच्या त्या गाण्यावर सातारकर खुश

सातारा दि २४(प्रतिनिधी)- खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा सातारकरांना उदयराजेंचा हटके अंदाज पहायला मिळाला कारण होते खुद्द राजेंच्या वाढदिवसाचे. या कार्यक्रमात उदयराजेंनी चक्क गाणे गायले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातील गांधी मैदानावर सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांचा ‘जल्लोष गाण्यांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहित राऊतच्या आग्रहानंतर उदयनराजेंच्या तोंडून गाणे एैकण्याची संधी मिळाली. उदयनराजेंनी “तेरे बिना… जिया जाये ना” हे गाणे गात सातारकरांना मंत्रमुग्ध करुन टाकले. हे गाणे त्यांनी आपल्या चाहत्यांना समर्पित केले आहे. राज्यात उदयनराजे यांचा मोठा चाहता वर्ग असून अनेकदा बघण्यात आले आहे की ते आपल्या समर्थकांचा तसेच चाहत्यांचा आग्रह फारसे मोडत नाहीत. यावेळी देखील गाणं गाण्याबाबत चाहत्यांनी हट्ट धरला तर त्यांनी तो प्रेमाने मान्य केला.

GIF Advt

 

भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज ५७ व्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजे कधी बुलेट राईड, तर कधी जिममध्ये व्यायाम करत आपल्या अनोख्या स्टाईलने चाहत्यांना खुश करत असतात. त्यांची कॉलर उडवण्याची शैली तर पाठिराख्यांमध्ये खुपच प्रसिद्ध आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!