Latest Marathi News

‘रश्मी ठाकरे संपादक झाल्यावर संजय राऊतांनी अश्लील शिव्या दिल्या’

शिंदे गटाचे रामदास कदम यांचा गाैप्यस्फोट, उद्धव ठाकरेंवर साधला निशाना

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गट आणि संजय राऊत यांच्यात विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्याला मारण्याची सुपारी दिली असल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधत धक्कादायक गाैप्यस्फोट केला आहे.

रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे आणि राऊत यांच्यावर जोरदार निशाना साधला ते म्हणाले, “ज्या वेळेला सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी रश्मी वहिनींना दिली, त्यावेळेला तुम्ही उद्धव ठाकरे व रश्मी वहिनी यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरली होती. हे मी विसरलेलो नाही. असा गाैप्यस्फोट कदम यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की बाटगा अधिक कडवा असतो तोच कडवेपणा तुम्ही दाखवत आहात. संजय राऊत कुणाकडून सुपारी घेऊन बोलत आहेत, हे मी सगळच बोलणार आहे पण अजून थोडे दिवस मी थांबतोय, असे म्हणत कदम यांनी आणखी खुलासे करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर कदम यांनी संजय राऊतांवर जोरदार प्रहार केला. त्याचबरोबर मला व माझ्या मुलाला आमदार योगेश याला संपवायचा प्रयत्न केला. आपल्याच पक्षाचा असलेल्या आमदाराला आपणच कसे संपवता? कोणता पक्षप्रमुख असा वागतो, असा सवाल ठाकरे यांनी विचारला आहे.

खेड येथे उद्धव ठाकरे यांची ५ मार्चला सभा होणार आहे. या विषयावर बोलताना ते म्हणाले की, ठाकरे यांच्या सभेचा स्थानिक राजकारणावर तसूभरही परिणाम होणार नाही. शिमगा झाल्यानंतर १९ मार्चला याच ठिकाणी मी सभा घेईन. त्यावेळी मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!