Latest Marathi News

उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची आॅफर

देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा, एकनाथ शिंदेच्या बंडानंतर पडद्यामागे काय घडले?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडे धक्कादायक गाैप्यस्फोट करताना दिसत आहे. पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांची परवानगी होती असे विधान करुन फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्याला मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव देत युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती असा गाैप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नि २४ तासला मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे.ते म्हणाले, “एकनाथ शिंदे सुरतमार्गे आमदारांना घेऊन निघाले तेव्हा उद्धव ठाकरे फोन करुन म्हणाले जाऊ देत आता झालं ते झालं तुम्ही मुख्यमंत्री व्हा. त्यावेळी मी खूप स्पष्टपणे सांगितलं की आता ती वेळ गेली आहे. मी धोका देणाऱ्यांपैकी नाही. जे लोक आमच्यासोबत आले आहेत त्यांना आम्ही तोंडघशी पाडू शकत नाही. तुमचं इतर काही असेल तर दिल्लीत बोला असंही मी त्यांना सांगितलं” असा दावा फडणवीस यांनी केला आहे. यावेळी फडणवीस यांनी भविष्यात उद्धव ठाकरें सोबत युती शक्य नसल्याचे सांगितले आहे. आम्ही चहा सोबत पिऊ शकतो. पण आता त्यांच्यसोबत जाऊ शकत नाही असेही फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकाळावर जोरदार टिका केली.

महाविकास आघाडी स्थापन होत होती तेव्हा पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांचा जीव गुदमरत होता. आपल्यासमोर पक्षाची वाताहात होताना त्यांना दिसत होती. उद्धवजी ऐकण्याच्या मानसिकतेत तेव्हा नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केले असे म्हणत फडणवीस यांनी शिंदे यांच्या बंडाला भाजपाचा सुरूवातीपासुन पाठिंबा होता याची स्पष्ट कबूली दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!