Latest Marathi News
Ganesh J GIF

खासदाराच्या कारचालकाची मुजोरी, टॅक्सी चालकाला उडवले

खासदाराच्या ड्रायव्हरचा मुजोरपणा कॅमे-यात कैद, बोनेटवर फरफटत नेले आणि..

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- दिल्लीतील गुन्हेगारी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण कायदा करणारे लोकप्रतिनिधीच कायदा मोडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खासदार चंदन सिंगच्या ड्रायव्हरने एका व्यक्तीला जोराची धडक देत त्याला फरफटत घेऊन गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बिहारमधील नवादाचे खासदार चंदन सिंग यांच्या ड्रायव्हरने रविवारी रात्री अकराच्या सुमारास आश्रम चौकाकडून निजामुद्दीन दर्ग्याच्या दिशेने येणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याने या व्यक्तीला सुमारे २-३ किलोमीटर बोनेटवरून फरफटत नेले. पण पोलीसांनी तातडीने लक्ष दिल्याने संबंधित व्यक्तीचा जीव वाचला आहे. अपघाताच्या वेळी चंदन सिंह हे गाडीत उपस्थित नव्हते, चालक गाडी चालवत होता. या प्रकरणी पोलिसांनी गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खासदाराच्या गाडी चालकाचे नाव रामचंद कुमार आहे. तर चेतन असे पीडितेचे नाव असून तो कॅब चालक आहे. चेतनने सांगितलं की, ‘मी ड्रायव्हर म्हणून काम करतो, एका प्रवाशाला सोडून परतत होतो. आश्रमजवळ पोहोचल्यावर एका कारने माझ्या कारला तीन वेळा जोरदार धडक दिली. मग मी माझ्या गाडीतून बाहेर आलो आणि त्याच्या गाडीसमोर उभा राहिलो. त्यानंतर आरोपीने गाडी सुरू केली आणि मी गाडीच्या बोनेटला लटकत होतो. ती व्यक्ती दारूच्या नशेत होती. वाटेत मला एक पीसीआर उभा असलेला दिसला आणि त्यात असलेल्या पोलिसांनी आमचा पाठलाग करून गाडीत बसवून आरोपीला काही वेळात अडवले. त्यामुळे माझा जीव वाचला असे चेतनने सांगितले आहे.

ड्रायव्हर रामचंद कुमार याने सांगितले की,”मी त्याच्या गाडीला धक्काही लावला नाही. आमच्या दोघांच्या गाडीवर कोणताच भाग मोडला नाही. त्याने माझी गाडी जबरदस्तीने अडवण्याचा प्रयत्न केला आणि बोनटवर उडी मारली, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!