Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे हादरले ! भर दिवसा कोयत्यानी वार करत एकाची हत्या

पुण्यात टोळक्यांचा मुजोरपणा वाढला, पोलीसांचा धाक संपला? हल्ल्याचा थरार कॅमे-यात कैद

पुणे दि १(प्रतिनिधी)-  घर व गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्याला हटकल्याचा राग आल्याने टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता पुण्यातील केशवनगर येथे घडली.

या दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती. रवींद्र गायकवाड (वय ५९, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड यांचे केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत घर आहे. तेथेच गाई – म्हशींचा गोठा आहे. रविवारी रवींद्र गायकवाड यांच्या गोठ्याजवळ काही तरुण अंमली पदार्थाची नशा करीत बसले होते. त्यावेळी गायकवाड यांनी त्यांना हटकले असता, त्याचा राग आल्याने टोळक्याने त्यांना मारहाण करून पळ काढला. काही वेळाने पुन्हा या तरुणांनी हातात कोयते घेऊन येत गायकवाड त्यांच्यावर वार केले.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भर दिवसा कोयत्याने वार करत ही हत्या झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!