
कान्स फेस्टिवलमध्ये दिसला मिसेस मुख्यमंत्र्यांचा जलवा
जागतिक स्तरावर मिळाली मोठी जबाबदारी, शेअर केले खास मोठे, या क्षेत्रात करणार काम?
मुंबई – सध्या सर्वत्र कान्स फेस्टिव्हलची चर्चा आहे. अनेक अभिनेत्री यात हटके स्टाईलसाठी चर्चेत असतात. पण आता या फेस्टिवलमध्ये मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनीही आपली उपस्थिती दर्शवली.
कान्समधील खास क्षणाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये दमदार हजेरी लावली. अमृता यांनी युनेस्को आणि बेटर वर्ल्ड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिलांची समानता’ या महत्त्वपूर्ण विषयावरील चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळी अमृता फडणवीस यांनी जगभरातील महिलांच्या हक्कांसाठी आणि समान संधींसाठी आपले विचार स्पष्टपणे मांडले. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या गरजेवर जोर दिला आणि या दिशेने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे Ambassador for Women’s Rights’ म्हणून काम बघणार आहेत. या भूमिकेतून त्या आता जागतिक स्तरावर महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणार आहेत आणि त्यांच्यासाठी कार्य करणार आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अमृता फडणवीस यांनी हटके स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाला ११ मे पासून सुरुवात झाली होती. आज २४ मे रोजी याचा शेवट होणार आहे. इन्फ्लुएन्सर सोनम छाब्राने हिने दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख असलेला ड्रेस परिधान करुन दहशतवादाचा विरोध केला आहे.