Just another WordPress site

यवत मध्ये खून, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात… पोलीस निरीक्षक नारायण पवार नेमक काय म्हणाले…ही बातमी बघा

यवत प्रतिनिधी – दौंड तालुक्यातील यवत येथे खळबळजनक घटना घडली. दौंड तालुक्यातील यवत येथील पालखी स्थळ येथे धारधार शास्त्राने पोटात , छातीत सपासप वार करुन एक तरुणाचा खुन करण्यात आलाय. खून झालेला तरुण संजय बनकर अस खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दौंड तालुक्यातील यवत येथे एका व्यक्तीचा खून झाल्याने यवत येथे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आला आहे. रात्री त्यावेळी खुन करण्यात आला आहे.
यवतमधील पालखीतळावरील शेडमध्ये एक अज्ञात व्यक्तीने बनकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसून आला. त्याच्या पोटात छातीत धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत होते. या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास यंत्रनेच्या आधारे या व्यक्तीची ओळख पटवण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. संबंधित खून झालेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव संजय सखाराम बनकर असे असून, सदरील मयत इसम हा सोलापूर शहरातील रहिवासी असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. यवत पोलिसांनी अज्ञात व्यक्ती वर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करत आहे.

GIF Advt

झालेल्या घटनेसंदर्भात यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार काय म्हणतात ते पाहूयात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!