एकतर माझी अंतयात्रा निघेल, नाहीतर मराठा आरक्षणाच्या विजयात्रा निघेल
मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला अल्टीमेटम, आंतरवली सराटीत रेकाॅर्ड ब्रेक सभा, छगन भुजबळांला लगावला टोला
जालना दि १४(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांची आज आंतरवली सराटी गावात भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकार सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा वाहण्याची शक्यता आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि भुजबळ यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची आंतरवलीत विराट सभा पार पडली. या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या विराट सभेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका केली आहे. त्याचबरोबर मराठ्यांना भडकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सदावर्ते आणि भूजबळ यांना सुपारी देण्यात आली असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच त्यांनी सरकारला सुचक इशारा दिला आहे. १० दिवसांत आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर काय करणार हे सांगू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा. आम्हाला महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल. पण एनटी व्हिजेएनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार. नाही तर ५० टक्क्याच्यावर घेणार नाही. असेही जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावले आहे. मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मात्र माराठ्यांवर टीका केल्यावर मराठा समाज भडकेल अन् यामध्ये काही वाद निर्माण होईल, अशा उद्देशाने ॅड गुणारत्न सदावर्ते आणि राष्ट्रवादीचे छगन भूजबळ मराठा समाजाच्या लढयावर टीका करीत आहेत. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी सांगितले आहे. अशी मला माहिती मिळाली आहे, असा थेट आरोप जरांगे यांनी यावेळी केला. दरम्यान आजच्या सभेला रेकाॅर्ड ब्रेक गर्दी झाली होती. आता २४ तारखेला मराठा आरक्षणाची पुढची रणनिती ठरवणार आहे. सभेला आलेल्या नागरिकांसाठी आंतरवलीत सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या. सभेच्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या सभेसाठी ७ कोटी खर्च आला असल्याची टीका छगन भूजबळ यांनी काल केली होती. या टीकेचा जरांगे यांनी जाहीर सभेत खरपूस समाचार घेतला आहे. आम्ही १२३ गावातून निधी गोळा केला आणि त्यातून २१ लाख जमा झाले. लगेच हिशोब घे म्हणावं त्याला सात कोटी वाल्याला. हे मराठ्यांना सांगणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी नाही, ते सात-आठ वेळा जाऊन आलंय, आणखी जायची वेळ आली त्याची परत, असं म्हणत छगन भुजबळांना जरांगेंनी टोला लगावला आहे.