Just another WordPress site

‘तुमच्यामुळे माझ हृदय आणि आत्मविश्वात तुटलाय’

बघा या अभिनेत्रीसोबत काय घडले, कोणाची आहे पंचिग बॅग

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- बाॅलीवूड बरोबर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदना आपल्या अभिनयामुळे ओळखली जाते. तिच्या फॅन्सबरोबर सुद्धा ती कनेक्ट असते.पण काही नेटकरी रश्मिकाला अत्यंत वाईट पद्धतीनं ट्रोल करत आहेत. सातत्यानं होणाऱ्या या ट्रोलिंगवर रश्मिकानं एक प्रदीर्घ पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून तिनं तिच्याविरोधात केली जाणारी वक्तव्य, टीका आणि पसरवली जाणारी नकारात्मकता यावर भाष्य केले आहे.

GIF Advt


रश्मिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा फोटो शेअर करत एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.तीने लिहिले आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून किंवा वर्षांपासून काही गोष्टींचा मला खूप त्रास होत आहे. आता त्या त्रासदायक गोष्टींवर बोलण्याची वेळ आली आहे. हे मी फक्त आता माझ्यासाठी बोलत आहे. खरं तर हे मी आधीच करायला हवे होते. जेव्ही मी करिअरला सुरुवात केली तेव्हापासूनच मला तिरस्काराला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे मला आता असं वाटतं आहे की मी ट्रोल्सर्ससाठी पंचिंग बॅग झाले आहे. मला माहिती आहे की मी जे आयुष्य निवडलं आहे त्याची मोठी किंमत मला चुकवावी लागत आहे. मला हे मान्य आहे की मी काहींना आवडत नाही. अर्थात मी सगळ्यांनाच आवडावी अशी माझी अपेक्षाही नाही. परंतु मी तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही माझ्याविरोधात बोलावं असा त्याचा अर्थ असा होत नाही.’असे तिने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे. पण त्याचबरोबर तिच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी, तिच्यासाठी जे प्रेरणा आहेत त्यांच्यासाठी ती काम करत राहील असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.

रश्मिकाने अवघ्य १७ व्या वर्षी अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. रश्मिका साऊथमध्ये खुपच लोकप्रिय आहे.इतकेच नाही तर रश्मिकानं गुडबाय सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. पुष्पा सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला होता.पण ट्रोलचा सामना कराव्या लागणाऱ्या रश्मिकाचे इन्स्टाग्रामवर ३५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!