
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून माझ्या जीवाला धोका’
भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार, अजितदादा म्हणाले माझ्याकडून एकच धोका...
पुणे दि १२(प्रतिनिधी)- अजित पवार आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना पुण्यात मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजप पदाधिकाऱ्याने ही तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्यापासुन धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रवींद्र साळगावकर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे अध्यक्ष आहेत. गणेश खिंड परिसरात एक मोकळा भूखंड आहे. या भूखंडाची मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही मोजणी केली जात होती. या भूखंडाचा ताबा साळगावकर यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने धमक्या येत होत्या. याच प्रकरणात साळगावकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. अजित पवारांपासून मला धोका आहे, असं त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे. त्यामुळे अजित पवारांची चौकशी करा. त्यांचा तपास करण्याची मागणी केली आहे. अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. रवींद्र सळगावकर यांनी त्यांच्या लेटर हेडवर तक्रार लिहून खडक पोलिसांना दिली आहे. पुढील तपास, कारवाई पोलिस करतील. दरम्यान साळगावकर यांनी त्यांच्या लेटर हेडवर अजित पवार यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्यापासून मला धोका आहे, असे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे. त्यामुळे अजित पवार यांची चौकशी करा. त्यांचा तपास करण्याची मागणी केली आहे.
भाजप पदाधिकाऱ्याने जीवाला धोका असल्याची तक्रार दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, माझ्याविरोधात ज्याने तक्रार दिलीय त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. त्याचबरोबर माझ्याकडुन राजकीय धोका असु शकतो, फिजिकल धोका मी काय देणार?” असे सुचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.