
मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?
राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंच्या सुरात सुर, राज्याच्या राजकारणात भुकंपाची मालिका
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील बाबरीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. यावेळी राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंना साथ देत चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे. आजघडीला राज आणि उद्धवमधले मतभेद टोकाचे असले तरी त्यांच्यात एक जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा दिसून आले आहे.
बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन सेनाभवनमध्ये झाला हे म्हणणे चुकीचं आहे. तसेच बाबरी पाडण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग नव्हता. बाबरी मशीद पाडण्याचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केले होते असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत चंद्राकांत पाटलांच्या वक्तव्यावर हल्लाबोल करत पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.त्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा देत ज्यांनी बाळासाहेबांच्या प्रमाणिकपणावर, शौर्यावर प्रश्नचिन्ह उभ केलं आहे त्यांनी तो बघावं असं आवाहन केलं आहे. त्यामुळे राज उद्धव पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे. कारण आजघडीला भाजप राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या भावनिक मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद असले तरीही जेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा विषयी बोलले जाते तेव्हा मात्र दोघे आजच्यासारखे एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत. पण बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नकारात्मक विधान केल्यामुळे चंद्रकांत पाटील आपल्या पक्षातही अडचणीत आले आहेत.
उद्धव ठाकरेंची तब्येत बिघडली तेव्हा राज त्यांना भेटायला गेले होते. तर काही प्रसंगामध्ये उद्धव यांनी त्यांची पाठराखण केल्याचं देखील दिसून आलेले आहे. त्यामुळे जर राज उद्धव एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात फार मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे.