पुणे : दारु पिताना झालेल्या वादातून भाच्याने मामाच्या डोक्यात गजाने मारहाण केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी भाच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आनंद शंकरराव काळंगिरे (वय ४५, रा. हनुमाननगर, पिसोळी) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाचा सचिन राम एलनवाड (वय २५, रा. हनुमानगर पिसोळी, मुळ रा. खानापूर, नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत काळंगिरे यांचा मुलगा हनुमंत काळंगिरे (वय २३, रा. रामनगर, रहाटणी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ७९३/२३) दिली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद आणि त्याचां भाचा सचिन हे हनुमाननगरमधील सार्वजनिक रोडलगत झोपडपट्टीत २५ जुलैला दुपारी दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. त्या वादातून सचिनने मामा आनंद यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या आनंद यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.
पोलिसांनी सचिन एलनवाड याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करीत आहेत.