Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे शहरातून फरार झालेला तिसरा संशयित दहशवादीबद्दल नवीन अपडेट

पुणे (प्रतिनिधी ) –  पुणे शहरात दीड वर्षांपासून दहशतवादी राहत होते. या प्रकरणी पुणे पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले. एका गाडी चोरीच्या गुन्हा प्रकरणाची चौकशी करताना पोलीसांना हे आरोपी मिळून आले.

त्यावेळी त्याचा तिसरा साथीदार फरार झाला. या आरोपींचा संबंध जयपुरातील सीरियल ब्लास्ट प्रकरणाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय तपास संस्था त्यांचा शोध घेत होती. परंतु ते फारार असल्याने एनआयएने त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या दहशतवाद्यांचा समावेश मोस्ट वॉन्टेडच्या यादीत केला होते. या प्रकरणातील दोन आरोपी सापडले असले तरी तिसरा आरोपी फरार आहे.

तिसरा आरोपीसंदर्भात काय मिळाले अपडेट

पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोन आरोपींना १८ जुलै रोजी अटक केली होती. मोटारसायकल चोरी प्रकरणात त्यांची चौकशी पोलिसांनी सुरु केली. त्यावेळी ते घाबरले. त्यांच्या घराची तपासणी केली असता अनेक आक्षेपार्ह दस्ताऐवज आणि वस्तू मिळाल्या. यावेळी तिसरा आरोपी शहानवाज आलम फरार झाला. आता पोलिसांनी फरार दहशतवादी शहानवाज याचा फोटो जारी केला आहे. ATS कडून तिसऱ्या संशयित दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.

अनेक गुन्ह्यातील आरोपी

शहानवाज आलम हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याने महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी यांना लॉजिस्टिक मदत केली होती. तो फरार झाल्यानंतर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. परंतु अद्याप तो मिळाला नसल्यामुळे त्याचा फोटो जारी केला आहे.

इम्रान खान मास्टर माइंड आहे. त्याचे नाव २०१५ मध्येही समोर आले होते. तो सीरियात जाणार होता. त्यापूर्वीच त्याला अटक झाली. त्यानंतर तो जमिनावर मुक्त झाल्यानंतर फरार झाला होता. अखेर त्याला पुणे पोलिसांनी अटक केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!