Latest Marathi News
Ganesh J GIF

दारुच्या नशेत असलेल्या तरुणाला पोलिसांनी घटनास्थळी नेत धु-धू धुतलं

अहमदाबाद – रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे तुम्ही पहिले असेलचं. यामध्ये काही वेळा गाडी चालकाची चुकी असते तर काही वेळा नागरिकांची चुकी असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये पोलीस एका आरोपी चालकाला मारहाण करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. पोलिसांनी त्या तरुणाला घटनास्थळी नेत त्याला चांगलाच चोप दिला आहे.

काय घडले नेमके?

गुजरातच्या अहमदाबाद येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या कारचालकाला घटनास्थळी नेऊन चांगलीच धुलाई केली. सोमवारी मणीनगर परिसरात या कार चालकाने अपघात केला होता.त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. दरम्यान, अपघात झाला तेव्हा फूटपाथवर काही लोक होते. मात्र सुदैवाने त्या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. दारुच्या नशेत लोकांच्या अंगावर गाडी घातलेल्या तरुणाला पोलिसांनी घटनास्थळी नेत धु-धू धुतलं 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. यानंतर ते चालकाला अपघात झाला होता त्या घटनास्थळी घेऊन गेले. यावेळी पोलिसांनी लोकांसमोर चालकाला धडा शिकवला. पोलिसांनी लाठीने चालकाला बेदम मारहाण केली. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!