Latest Marathi News

‘आपला कुठलाही देव बॅचलर नाही, कुठलाही महापुरुष बॅचलर नाही’

चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मारूतीराया घेणार चंद्रकांत पाटलांची भेट

पुणे दि १४(प्रतिनिधी)- राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.विरोधकांनी पाटील यांना लक्ष्य केले आहे.

पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले “आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरूष बॅचलर नाहीत. संसार करून सगळं करता येतं. सेवाही करता येते.जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. सगळ्यांना सारखंच बनवून पाठवलं.सगळ्यांना दोन कान, दोन डोळे आणि समान शरीर देवाने दिले आहे”, असे पाटील म्हणाले आहेत. त्याचबरोबर “माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही. तो स्पर्म १०० किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कुणीतरी आहे ना? असा प्रश्न विचारत, पूर्वी एसपी कॅलेजच्या कट्ट्यावर मुलं मुलींची टिंगल करताना दिसायची. आता मुलंच तिथे जायला घाबरतात. कारण आता मुलींच मुलांची टिंगल करतात, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान जितेंद्रआव्हाड यांनी खास आपल्या शैलीत चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले आहे. आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांतदादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या आणि सगळ्यांनी मारुतीकडे पाहण्यास सुरूवात केली आणि मारुतीला चंद्रकांत पाटील यांचं म्हणं ऐकवलं. मारुतीने निर्णय घेतला आहे की लवकरच चंद्रकांतदादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत की नाही यावर सविस्तर चर्चा करणार. संसार करून पण सगळं करता येतं असं महापुरुष आणि देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. असं खोचक ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!