Latest Marathi News
Ganesh J GIF

शॉर्ट स्कॅट घालून तरुणींचा ट्रेनमध्ये आक्षेपार्ह डान्स व्हायरल

महिला आयोगाचा आक्षेप, दिल्ली मेट्रोनंतर रेल्वेही वादात, सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल

दिल्ली दि ७(प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रो मधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाचा टॉवेल घालून मेट्रोमधून प्रवास, मंजुलिका बनून तरुणुची मेट्रोमध्ये एंट्री, तर एका तरूणीने चक्क बिकीन घालून वातावरण तापवले होते. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पण पुन्हा दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तरुणींचा एक ग्रुप डान्स करताना दिसत आहे. सीटच्या वरच्या बर्थवर बसलेल्या तरुणीने डान्सला सुरुवात केली, त्यानंतर पॅसेजमधील एक तरुणी स्टेप करते, मग कॅमेरा सीटच्या वरच्या बर्थवर असलेल्या मुलीकडे वळतो. त्यानंतर हा कॅमेरा तरुणींच्या ग्रुपकडे जातो. शेवटी हा कॅमेरा डब्याच्या मध्ये असलेल्या इतर मुलींकडे वळतो. या सगळ्या मुलींचा डान्स पाहून नेटकरी कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आज सोशल मीडियासाठी सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्ड आणि रील्स बनवण्याचे फॅड आले आहे. ही तरुणाई मागेपुढे बघत नाही आणि कसलीही लाज न बाळगता व्हिडीओ काढत सुटतात. असाच एका तरुणींच्या ग्रुपचा एक्स्प्रेसमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन तरुणी आक्षेपार्य कृत्य करताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली महिला आयोगाने या व्हिडिओवर आक्षेप व्यक्त केला आहे. असे कृत्य पुन्हा चालणार नाही, असे आवाहन दिल्ली मेट्रोने नागरिकांना केले आहे. सोशल मीडिया ट्विटर प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. @vaidehihihaha या अकाउंटद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

आजकाल दिल्ली मेट्रोमधील अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकं झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी मेट्रोमध्ये काही ना करताना दिसत आहेत. दिल्ली मेट्रो प्रवाशांना वारंवार लोकांना मेट्रोच्या आत असे रील्स किंवा व्हिडिओ न बनवण्याचं आवाहन देण्यात येत आहे. तरीही लोक मेट्रोच्या आत व्हिडिओ बनवनं काही बंद करत नसल्याचे दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!