Latest Marathi News
Ganesh J GIF

वादग्रस्त चित्रपटामुळे ही अभिनेत्री चर्चेत म्हणाली हा चित्रपट..

सोशल मिडीयावर ही अभिनेत्री चर्चेत, अर्ध्यावरती सोडलेले शिक्षण, म्हणाली स्वातंत्र्याकडून भीतीकडे....

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- केरळ स्टोरी चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपट समाजप्रबोधनपर आहे असे एका गटाचे म्हणणे आहे तर चित्रपट प्रचारकी असल्याचे दुसऱ्या गटाचे ठाम मत आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री अदा धर्माची सध्या सोशल मिडीयावर तुफान चर्चा सुरु आहे. पण या चित्रपटाबद्दल अदाने सकारात्मकता दाखवली आहे.


अदा शर्माचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे झाल. तिचे वडील एस.एल. शर्मा हे भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते जे मूळचे मदुराई, तामिळनाडूचे होते. तिच्या आईचे नाव शीला शर्मा आहे, त्या मल्याळी आहे आणि भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करण्याव्यतिरिक्त मल्लखांबा योगा देखील करतात. अदाची आई केरळमधील पलक्कड येथील रहिवासी आहे. अदाला शिक्षणाची फारशी आवड नव्हती, म्हणून तिने आपलं शिक्षण सोडलं, नंतर तिने कथकमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. अदा शर्मा तिच्या आगामी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने चित्रपटावरील वादावर प्रतिक्रिया देताना “हा चित्रपट मुलींना अंमली पदार्थांच्या आहारी जाणे, ब्रेनवॉश करणे, बलात्कार करणे, मानवी तस्करी करणे, बळजबरीने गर्भधारणा करणे आणि नंतर अनेक लोकांकडून पुन्हा बलात्कार करणे, त्यांनी जन्म दिलेल्या मुलाला घेऊन जाऊन त्यांना आत्मघाती बॉम्बर बनवले जाते, याबद्दल आहे. हे जीवन आणि मृत्यूबद्दल आहे! जे काही लोक त्याचा प्रचार करत आहेत, मला वाटते की त्यांनी एकदा सर्व तथ्यांसह चित्रपट पाहिला की ते असे म्हणणार नाहीत.” असे मत मांडले आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. आता चित्रपटाच्या ट्रेलरवर यूट्यूबने आक्षेप घेत कारवाई केली आहे. हा चित्रपट ४ मुलींच्या जीवनावर आधारित आहे. द केरळ स्टोरीमध्ये अदा शर्मा, योगिता बिहाणी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी या अभिनेत्रींनी काम केले आहे. दरम्यान चित्रपट जरी वादात असला तरी बाॅक्स आॅफिसवर मात्र चित्रपट हिट ठरला आहे.

अदाने २००८ मध्ये विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘1920 स्लॅशर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1920 च्या यशानंतर अदा फिर , हम है राही कार के, आणि हसी तो फसी सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. अदाने तेलगू चित्रपटातही आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे. पण चित्रपटातील कथेमुळे सिनेमा आणि अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!