लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नीने केली पतीची हत्या
अनैतिक संबंधामुळे पती पत्नीच्या नात्याला काळीमा, हत्या करणारी पत्नी अटकेत
गया दि २६(प्रतिनिधी)- लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो या दिवशी पती पत्नी पुढील आयुष्यात सुख दुखात एकमेकांना साथ देण्याचे वचन देत असतात. पण आजकाल या नात्याला गालबोट लागले असुन या नात्यातील विश्वास कमी होत चालला आहे. बिहारमधील गया येथे अशीच एक घटना समोर आली आहे. पत्नीने लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
अशोक कुमार असे मृत पतीचे नाव असून रेवती कुमारी असे खून करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक कुमार यांचा रेवती कुमारीसोबत २९ मे रोजी विवाह झाला होता. अशोकने ३० मे रोजी नववधूला घरी आणले.दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मे रोजी अशोक अचानक गायब झाला. त्याचा शोध घेतल्यानंतर तो कोठेही न सापडल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पण पोलिसांना १ जूनला अशोकचा मृतदेह आढळून आला. त्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांना खुनाचा तपास सुरु केला. यावेळी अशोकची पत्नी रेवतीचे तिचा चुलत भाऊ उपेंद्र यादव याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. याची माहिती अशोकला झाली होती. त्यामुळे तिने अशोकच्या हत्येचा कट रचला होता. पोलीसांनी तिची विशेष चाैकशी केली असत तिने पतीच्या चुलत भावाला अशोकचा खून केल्याचे सांगितले. दरम्यान रेवतीचा प्रियकर उपेंद्र यादव याचाही खून झाल्याचे समोर आले आहे.
पोलीसांनी रेवतीला अटक केली आहे. आता पोलीस उपेंद्र यादवची हत्या कोणी केली, याचा शोध घेत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर अशोकच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अनैतिक संबंधामुळे एका नात्याची सुरूवात होण्याआधीच अंत झाला आहे.