Latest Marathi News
Ganesh J GIF

डिजिटल इंडीयाकडे वाटचाल करताना राज्यात एवढे लोक निरिक्षर

सर्वाधिक निरिक्षर या जिल्ह्यात, पहा कोणत्या जिल्ह्यात किती निरिक्षर, या वर्षापर्यंत साक्षर करण्याचे आव्हान

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात सर्व शिक्षा अभियान जोरकसपणे राबवत असताना एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आपण एकीकडे डिजिटल इंडियाची स्वप्न पाहत असताना दुसरीकडे काहींना अक्षर ओळखही नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील निरिक्षरची आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात जवळपास सव्वा लाख निरक्षर असल्याचे समोर आले आहे. त्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत साक्षर करण्याचे आव्हान असणार आहे. केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबवण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून त्यानुसार महाराष्ट्रातही कामकाज सुरू झाले आहे. त्याअंतर्गत सरकारला निरीक्षर मुक्तीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. नवीन आकडेवारीनुसार
राज्यात सर्वाधिक निरिक्षर नंदुरबार जिल्ह्यात आहेत. तिथे ६८ हजार ८२० निरक्षर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार ७९६ निरक्षर असल्याचे समोर आले आहे. या निरक्षणामध्ये सर्वाधिक प्रमाण ३५ वर्षापुढील व्यक्तींचा समावेश आहे. आधुनिक जगातही अनेक कारणांमुळे राज्यात निरक्षर समस्या अजूनही कायम आहे. आता यांना स्वयंसेवकांच्या सहाय्याने साक्षर करण्यावर भर दिला जाणार आहे. पण ही आकडेवारी २०११ च्या जनगणनेच्या आधारे घेतली आहे.

जिल्हा आणि निरिक्षर संख्या
अहमदनगर २०,७०२,
अकोला ६,२५०,
अमरावती ९,४१८,
छत्रपती संभाजीनगर १७,८३७, भंडारा ४,४२७,
बीड १४,५८२,
बुलढाणा ११,३२७,
चंद्रपूर ९,३७४,
धुळे ११,१५४,
गडचिरोली ३७,२००,
गोंदिया ४,८१७,
हिंगोली ६,२५०,
जळगाव १९,७९०,
जालना ११,२८४,
कोल्हापूर १५,४५०,
लातूर ११,७६१,
मुंबई शहर ८,२८९,
मुंबई उपनगर २६,०४०,
नागपूर १४,३२२,
नांदेड १७,४४७,
नंदूरबार ६८,८२०,
नाशिक २८,२५३,
परभणी १०,०२५,
पुणे३३,३७५,
रायगड १०,३७३,
रत्नागिरी ६,३३६,
सांगली ११,४५८,
सातारा ११,४१४,
सिंधुदुर्ग २,६९१,
सोलापूर २१,३०९,
ठाणे ४०,७९६,
वर्धा ५,१२३,
वाशिम ३१,६२०,
यवतमाळ १२,३२६

टीप- ही माहिती विविध संकेतस्थरांवरुन घेतलेली आहे. याची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!