Latest Marathi News
Ganesh J GIF

‘वेळेत डिलिव्हरी’ ठरली शाप; सहकाऱ्यांनीच मत्सरातून केला चाकू हल्ला

नागपूर शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीत वेळेत डिलिव्हरी करून नाव कमावणे एका डिलिव्हरी बॉयला भलतेच महागात पडले आहे. त्याच्याच सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी मत्सरातून त्याच्यावर प्राणघातक चाकू हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसटी महामंडळ क्वार्टरसमोर उशिरा रात्री ही भीषण घटना घडली.

नक्की काय घडलं?

अमीन मुस्तफा पठाण (वय ३४ वर्ष, रा. ऊंटखाना, नागपूर) हा ‘ब्लिंकइट’ (Blinkit) कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.अमीन प्रत्येक ऑर्डर वेळेवर पूर्ण करत असल्याने कंपनीत त्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती. याच गोष्टीचा आणि त्याच्या कामाचा राग मनात धरून सोबतच काम करणारे केतन उरकुडे (२०) आणि श्रवण बारई (२०) हे दोघे त्याच्यावर जळत होते व सतत वाद घालत होते.२ ऑगस्ट रोजी सकाळी दोन्ही आरोपींनी अमीनला जीवे मारण्याची उघड धमकी दिली होती. त्यानंतर रात्री अमीन मॉडेल मिल चौकात डिलिव्हरी देऊन परतत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला.एसटी महामंडळाच्या क्वार्टरजवळ पोहोचताच आरोपींनी त्याची बाईक अडवून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात अमीन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

उपचारासाठी रुग्णालयात दाखल; आरोपींना बेड्या!

घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पुढे येत गंभीर जखमी अमीनला शासकीय मेडिकल रुग्णालयात (GMCH) दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गणेशपेठ पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत, अवघ्या काही तासांतच आरोपी केतन उरकुडे आणि श्रवण बारई या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!