Latest Marathi News
Ganesh J GIF

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ६५ जागा?

'त्या' अहवालानुसार शिंदे गटामुळे भाजपाचे आमदार घटणार, सत्ता जाण्याची शक्यता

मुंबई दि २३(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर घटेल, असा भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण त्या अहवालात विधानसभेलाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे.

भाजपच्या तावडे समितीच्या अंतर्गत सर्व्हेनुसार राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी तब्बल ३३ जागा महाविकास आघाडीला मिळतील, तर भाजपा युतीचे १५ ते १६ खासदार निवडून येतील असा अंदाज अहवालात वर्तविण्यास आला आहे. मात्र या अहवालात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत अंदाज वर्तवताना भाजपाची काळजी उडविणारे अंदाज सांगितले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ ६०-६५ जागा मिळतील तर शिंदे गटाला फक्त ७-८ जागा मिळतील असा अहवाल समोर आला आहे. भाजपच्या अंतर्गत अहवालानुसार उद्धव ठाकरेंच्या प्रति लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शिवसेना फुटीमुळे केवळ हिंदू मतदारच नव्हे तर अल्पसंख्यांक आणि बहुजन समाजातील मतदार देखील उद्धव ठाकरेंसोबत मोठ्या प्रमाणात जाईल असा अंदाज आहे. या अहवालामुळेच अजित पवार भाजपासोबत जाणार अशा बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर देशभरात भाजपाला वेळेवर लक्ष न दिल्यास १०० जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीला घेऊन विनोद तावडे समितीचा महाराष्ट्र संदर्भाती अहवाल नकारात्मक आहे. अर्थात स्वतः विनोद तावडे आणि भाजपाने असा कोणताही अहवाल नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे तरीही अहवाल नकारात्मक असल्यानेच भाजपा ऑपरेशन लोटस राबवणार असल्याचे संकेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!