लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लीम तरूणाला बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, एमआयएमचे पठाण आक्रमक, मग वेगळाच मुद्दा समोर
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- लव्ह जिहाद हा मुद्दा सध्या जास्तच चर्चेत आला आहे. मुंबईत सध्या अशीच एक घटना घडली असून, लव्ह जिहादच्या आरोपाखाली एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर मारहाणीचा व्हिडिओ एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी शेअर करत चौकशीची मागणी केली आहे.
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर ही मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडिओत लाल शर्ट घातलेल्या एका तरुणाला जमावाकडून मारहाण होताना दिसत आहे. या तरुणाची मैत्रीण यावेळी जमावाला विरोध करताना दिसत आहे. हा जमाव तरुणाला मारहाण केल्यानंतर स्थानकाबाहेर ओढून नेताना या व्हिडिओत दिसत आहे. यानंतर जमावाकडून ‘जय श्री राम’च्या घोषण देखील दिल्या जात असल्याचं या व्हिडिओ दिसत आहे. दरम्यान माजी आमदार वारीस पठाण यांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणालेत की, “वांद्रे रेल्वे स्टेशनवर एका मुस्लिम तरुणाला लव्ह जिहादच्या नावाखाली मारहाण करण्यात आली. आज आपण ७७वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आपल्या शहीदांनी सुद्धा कधी विचार केला नसेल की मुस्लिमांना हा दिवस पहावा लागेल. मुंबई पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घ्यावी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करावी. तसेच त्यांना कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्यात यावी जेणेकरुन अशा प्रकारचे कृत्य करण्यापूर्वी कुणीही १०० वेळा विचार करेल.” आता पोलीस तपास करत आहेत.
बांद्रा स्टेशन पर एक निहतते मुस्लिम लड़के को लव जिहाद के नाम पर हिन्दुत्ववादी गुंडों द्वारा बेरहमी से पीटा गया !
हम आज यौमे आज़ादी का ७७ साल मना रहे है !
हमारे शहीदों ने कभी सोचा नहीं था की मुसलमानों को ये दिन भी देखना पड़ेगा।मुंबई पुलिस इस घटना का फ़ौरन संज्ञान ले और जो… pic.twitter.com/orSrNCGdHF
— Waris Pathan (@warispathan) August 15, 2023
दरम्यान घटना २१ जुलै २०२३ ची असल्याचे वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. तरूण आणि तरूणी १६ वर्षांचे असून ते अंबरनाथ येथील घरातून पळून मुंबईत आल्याचा आरोप आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या कुटुंबीयांनी अंबरनाथ पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. असा दावा करण्यात आला आहे.