नाद खुळा! पठ्ठयाने बायकोच्या वाढदिवशी ठेवला गौतमी पाटीलचा डान्स
सबसे कातील गाैतमी पाटीलची अशीही क्रेन, संपूर्ण महाराष्ट्रात होतेय जोडीची चर्चा
बीड दि २०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या डान्सर गौतमी पाटीलचीच चर्चा सुरू आहे. लहान पोरांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचे चाहते आहेत. अगदी बैलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात देखील गौतम दिसू लागली आहे. यामुळे सध्या याचीच चर्चा सुरू आहे. असे असताना आता एका पठ्ठ्याने बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला होता.
आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांची पत्नी प्रगती गावडे यांचा वाढदिवस होता. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेण्यात आला. यामुळे याची बरीच चर्चा झाली आहे. एखाद्या महिलेच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा शो हा राज्यातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.या अनोख्या वाढदिवसाला भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील हजेरी लावली होती. आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी आणि पत्नीच्या सांगण्यावरून आपण नृत्यांगना गौतमी पाटील हिला आपल्या गावामध्ये आणल्याचं किरण गावडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली होती. तब्बल पाच किलो पेक्षा अधिक मोठा केक आणला होता. दरम्यान आगळ्यावेगळ्या ह्या वाढदिवसामुळे सध्या महाराष्ट्रभर या कुटुंबाची सध्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या हस्ते केक कापल्यानंतर गौतमी पाटीलचा स्टेज शो झाला. यावेळी गौतमी पाटील यांच्या अदाकारी पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोकांनी गर्दी केली होती. याचा व्हिडीओही आला आहे.
गौतमीचा लवकरच ‘घुंगरू’ नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचे शूटिंग थायलंडमध्ये पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. पण गाैतमीची लावणी ब-यादचा वादात सापडली आहे.