Latest Marathi News
Ganesh J GIF

“विद्यार्थ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण?” – आग्या मोहोळ मधमाश्यांच्या पोळ्यावरून अमोल नाना तुपे आक्रामक

साडेसतरा नळी येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोळे हटविण्यासाठी प्रशासनाला निवेदन, अन्यथा स्वखर्चाने हटविण्याचा इशारा

हडपसर प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या साडेसतरा नळी येथील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या निष्पाप चिमुरड्यांच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर आणि जीवघेणा प्रश्न समोर आला आहे! शाळेच्या प्रांगणातील झाडावर आग्या मोहोळ सारख्या मधमाश्यांचे मोठे पोळे तयार झाले असून, यामुळे काही विद्यार्थी आधीच जखमी झाले आहेत. पहिली ते सातवीचे निष्पाप विद्यार्थी रोज या प्रांगणात वावरतात. हा चिमुरड्यांच्या जिवाशी चाललेला थेट खेळ नाही का या गंभीर निष्काळजीपणाविरोधात क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल तुपे यांनी हडपसर प्रभाग समिती, क्षेत्रीय कार्यालय, शिक्षण विभाग आणि अग्निशामक दलाला लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे. “उद्या जर या आग्या मोहोळ मधमाश्यांमुळे एखाद्या निष्पाप बालकाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी ही संवेदनहीन यंत्रणा घेणार का?” असा संतप्त सवाल अमोल नाना तुपे यांनी केला आहे. जर प्रशासनाने तात्काळ हे आगी मोहोळ मधमाश्यांचे पोळे हटवले नाही, तर क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी स्व खर्चाने तज्ञ व्यक्तिंकडून हे मधमाश्यांचे मोठे पोळे हटवले जाईल अशी माहिती दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!