Latest Marathi News
Ganesh J GIF

पीएमटी ड्रायव्हरने मोबाईलवर चित्रपट पाहात चालविली बस

बसचालकाचा प्रताप कॅमे-यात कैद, प्रवाशांचा जीव टांगणीला, नियमांना दिला खो

पुणे दि २१(प्रतिनिधी)- मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे. तशी पुण्याची लाईफ लाईन पीएमटी आहे. पुण्यात प्रवासासाठी अनेकजण पीएमटीला प्राधान्य देतात. पण अशातच आता पुण्यातील  निगडी डेपोच्या पीएमपी ड्रायव्हरचा प्रताप समोर आला आहे.

पुण्यात एका पीएमपीएमएल चालक आपल्या मोबाईल फोनवर चित्रपट पाहत गाडी चालवत होता. गाडीच्या स्टेयरिंगच्या मागे मोबाईल ठेवून तो गाडी चालवत होता. रात्रीच्या वेळी रस्त्यावर गर्दी असते त्यामुळे समोर पाहत गाडी चालवणे अपेक्षित असताना हा ड्रायव्हर मात्र बिनधास्तपणे मोबाईलवर चित्रपट पाहत होता. त्यामुळे एका प्रवाशाने ड्राईव्हरचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएल चालकाने एका तरुणीसोबत गैरप्रकार केल्याची घटनाही समोर आली होती. त्यानंतर आता ही आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पण यामुळे
सार्वजनिक रित्या सुरक्षित मानला जाणारा पुणे पीएमटीचा प्रवास देखील प्रवाशांसाठी धोकादायक बनत चालला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘पीएमपी’चे बरेच चालक बस चालविताना गळ्यात हेडफोन व खिशात मोबाइल बाळगतात. काही वेळा फोन आल्यानंतर ते उचलून बोलत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. दरम्यान या चालकावर कारवाई करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!