आमदार आदित्य ठाकरेंच्या लग्नाची थेट विधानसभेत चर्चा
फडणवीसांनी घेतली लग्नाची जबाबादारी, म्हणाले 'तोंड कसं बंद करायच...
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणातील मोस्ट एलिजेबल बॅचरल म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव घेतले जाते. पण आता चक्क विधानसभेतच आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा रंगली होती. त्यामुळे विधानसभेचे वातावरण थोडसं हलकं झाल्याचे पाहायला मिळाले.

विधिमंडळात बच्चू कडू यांनी प्रकल्प बंद झाल्यामुळे कामगार रस्त्यावर येत आहे असा मुद्दा मांडत काम नसल्यामुळे त्यांची लग्न तुटत असल्याचे सांगितले. त्यामुळे आधी लग्न जमलं आणि तुटलं त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची आणि तुटलं तर त्याला सांभळण्याची जबाबदारी सरकारची आहे अशी मुश्किल टिप्पणी केली. तसेच या मुद्द्यावर धोरण तयार करता येईल का?, हे आपण नक्की बघू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.पण यावेळी त्यांनी बच्चू कडू यांनी सदर प्रश्न आदित्य ठाकरेंकडे पाहून विचारला होता का? सरकारने लग्न लावायचं….तर आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. त्यावर आदित्य ठाकरेही नको, नको म्हणत उत्तर दिले, लग्न लावून देऊ वैगरे ही काही राजकीय धमकी आहे का?, असा मिश्किलपणे प्रश्न विचारला. यावर सभागृहात एकच हशा पिकला. यावर कोणाचं तोंड कसं बंद करायचं याचा हा उत्तर उपाय आहे. मी अनुभवातूनच बोलतोय, असे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता.
राज्यभरात दरवर्षी २५ ते ३० टक्के प्रकल्प बाद होतात. मोठे-मोठे प्रकल्प उभे राहतात आणि मग ते काही कारणास्तव बाद होतात. यामुळे कामगार रस्त्यावर येतात. त्यामुळे राज्य सरकारचं काहीतरी धोरण असायला हवं, असा मुद्दा बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता.