Latest Marathi News
Ganesh J GIF

समृद्धी महामार्गावर पोलिसांची ‘समृद्धी’, पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ व्हायरल

समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाची समृद्धी होईल अशी अपेक्षा सरकारकडून केली जात आहे. मात्र, सध्या या महामार्गावर पोलिसांची समृद्धी’ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अडवून पोलीस वसुली करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल  होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांनी पोलिसांकडून कशा प्रकारे वसुली केली जाते याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. दानवे यांनी महामार्गावर पोलिसांकडून वसुली केली जात असल्याचा आरोप केल्यानंतर महामार्ग पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. कमी वेळेत जास्त अंतर प्रवास करण्यासाठी समृद्धी महामार्ग फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. परंतु सध्या या माहामार्गावर पोलिसांची ‘समृद्धी’ सुरु असल्याचे दिसत आहे. अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ ट्विट  करत म्हटले की, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल अशी वल्गना सरकारची होती. पण रोजगार असलेल्या लोकांना अशी ‘समृद्धी’ येईल, हे नव्हतं सरकारने सांगितलं. गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा!, असे दानेव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक पोलीस एका वाहनचालकाकडून काही तरी घेऊन खिशात घालत असताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या ठिकाणी दोन पोलीस काहीतरी घेताना दिसत आहे. मोठ्या वाहनाचे क्लीनर यांना खाली उतरवून पोलीस त्यांच्याकडून काहीतरी घेऊन ते खिशात घालत असल्याचे दिसत आहे. चार ते पाच जणांना थांबवून हे पोलीस त्यांच्याकडून काहीतरी घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हीच पोलिसांची समृद्धी असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

पोलिसांकडून होतेय वसुली

समृद्धी महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या वाहनांची वाहतूक सुरु आहे. परंतु काही ठिकाणी पोलिसांकडून गाड्या अडवून त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एवढच नाही तर गाडी सोडण्यासाठी पोलिसांकडून पैसे घेते जात आहेत. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे.
यातच पोलिसांचा वसुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
समृद्धी महामार्गावर स्वत:ची समृद्धी करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!