Latest Marathi News

राज ठाकरेंच्या ‘राजगर्जने’चा दमदार डिझर प्रदर्शित

मनसेच्या वर्धापन दिनी ठाकरे कडाडणार, मनसेचे नवे गाणे पाहिले का?

मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचा ९ मार्चला वर्धापन दिन साजरा होणार आहे. यावेळी राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज्यात तयार झालेल्या नव्या राजकीय घडामोंडीचा राज ठाकरे आपल्या शैलीत समाचार घेण्याची शक्यता आहे. याचीच झलक दाखवणारा एक डिझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी काही दिवसापुर्वी बोलताना आता माझ्या सभेचा टिझर, ट्रेलर काहीच नसेल ९ तारखेला या सगळा पिक्चर दाखवतो असे ठाकरे म्हणाले होते. पण नव्या गाण्यासह मनसेच्या वर्धापनदिन सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे. प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा… नवनिर्माण घडवूया… मनसे” या दमदार गाण्याचा टिझर सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वर्धापन दिनाचा टिझर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यासोबतच ‘प्रतीक्षा नऊ मार्चची’ असे कॅप्शन दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजातील काही वाक्य या व्हिडीओच्या सुरुवातीला ऐकायला मिळतात. तसेच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे देखील टिझरमध्ये दिसत आहेत. हे सगळे क्षण गाण्यामध्ये गुंफण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. त्याचबरोबर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. यावर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!