Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणार शांततेचा नोबेल?

नोबेल समितीकडून भारतीय पंतप्रधान मोदींचे कौतुक, युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्नाचे काैतुक

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- पंतप्रधान पदावर विराजमान होऊन नऊ वर्ष झाल्यानंतरही मोदींची लोकप्रियता कायम आहे. जगात त्यांनी देशाची प्रतिमा विश्वगुरुच्या रुपाने स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. आता मोदींना शांततेचे नोबेल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नोबेल पारितोषिक समितीची टीम नॉर्वेहून भारतात आल्याने हा अंदाज व्यक्त होत आहे.

नोबेल पारितोषिक समितीच्या उपनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. “पीएम मोदी हे अत्यंत विश्वासू नेते आहेत. मोदी शांतता प्रस्थापित करू शकतात. ते जगातल्या अशा नेत्यांपैकी एक आहेत जे शांततेसाठी स्वतःचं योगदान देत आहेत. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितलं की, ये युद्धांचं युग नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत.आम्हाला नोबेल शांतता पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय नामांकन मिळत आहेत. मला आशा आहे की जगातील प्रत्येक नेता नोबेल शांतता पुरस्कारासाठी आवश्यक असलेले काम करेल.भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं योगदान देत आहेत. भारताला शांततेचा वारसा लाभला आहे, त्यामुळे भारत महासत्ता होणार हे निश्चित आहे. तसेच पीएम मोदी हे अतिशय शक्तिशाली देशातून आले आहेत, त्यांना खूप गांभीर्याने घेतले जाते. त्याच्यामध्ये अफाट विश्वासार्हता आहे. असे समितीचे नेते तोजे म्हणाले आहेत. हीच समिती शांतता पुरस्कार विजेत्याचा निर्णय घेते असते.

मोदींनी आपल्या यशस्वी राजकीय कारकिर्दिने जगभरात प्रभावशाली नेते म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. जगात शांतता राखण्यासाठी पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची आहे, असे विधान समितीने केले आहे. त्यामुळे मोदींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!