Latest Marathi News

महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणूकीसाठी जागावाटप ठरले

भाजप शिंदे गटाला देणार एकत्रित आव्हान,जागावाटपात कुणाला किती जागा? पहा

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या एकीला कसबा निवडणूकीत यश मिळाल्यानंतर राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढवणार आहे. त्याचबरोबर एक पाऊल पुढे टाकत तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपही निश्चित करण्यात आले आहे. युतीचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीने मागच्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवत शिवसेना २१, काँग्रेस ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १९ अशा प्रकारच्या जागावाटपाचे सूत्र ठरवण्यात आले आहे. पदवीधर मतदरासंघाबरोबरच गेल्या महिन्यात पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढल्याने त्यांना भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या विरोधात चांगली कामगिरी करता आली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी पक्षांच्या विरोधात एकत्रित लढावे, असे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान या जागावाटपाबाबत कोणत्याही पक्षाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नसला तरीही हेच सूत्र असेल अशी माहिती मिळत आहे. राज्यात २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीमधील घटक पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, तर काँग्रेसचा केवळ १ खासदार निवडून आला होता. महाविकास आघाडीतील पक्षाने अन्य कोणत्या पक्षासोबत युती केल्यास त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांमधून संबंधितांना जागा द्यावी अशीही चर्चा बैठकीत झाली आहे. एकंदरीत महाविकास आघाडीने जोरदार तयारी करत भाजपाला आव्हान दिले आहे.

मुंबई आणि उपनगरमधील लोकसभेच्या सहा जागांपैकी शिवसेनेला चार जागा देण्याबाबत चर्चा झाली. उर्वरित दोन जागांपैकी एक काँग्रेसला, तर एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. काँग्रेसने उत्तर मुंबई, तर राष्टवादी काँग्रसने ईशान्य मुंबई लढवावी हे देखील ठरल्याचे वृत्त आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!