Latest Marathi News
Ganesh J GIF

‘प्रॉब्लम शेयर करने से सब सही नहीं होता’

सेलिब्रेटिच्या आत्महत्येने बाॅलीवूड हादरले, डिझायनरने वयाच्या २५ व्या वर्षी संपवलं आयुष्य

लखनऊ दि २९(प्रतिनिधी)- उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील लोकप्रिय फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. वयाच्या २५ व्या वर्षी आत्महत्या करत तिने आपलं आयुष्य संपवलं आहे. तत्पूर्वी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुस्कानचे वडील चंद्र प्रकाश नारंग हे डिस्पोजल व्यापारी आहेत. चंद्र प्रकाश यांनी सांगितले की त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे, सर्वात मोठी मुलगी मुस्कान आहे. मुस्कान मुंबईतील एका कंपनीत फॅशन डिझायनर होती.शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तिच्या खोलीचा दरवाजा न उघडल्याने तिच्या आई व लहान बहिणींनी दरवाजा ठोठावला. पण मुस्कानने प्रतिसाद दिला नाही. काहीतरी अघटित घडेल असा अंदाज घेऊन खिडकीतून डोकावून पाहिले असता त्याचा मृतदेह. लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मुस्कान मुंबईवरुन माघारी आल्यानंतर नैराश्यात असल्या सारखी वाटत होती असे तिच्या वडिलांनी सांगितले आहे. फॅशन डिझायनर मुस्कानने तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओच्या सुरुवातीला मुस्कान म्हणाली आजचा हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल. यानंतर तुम्ही मला पाहू शकणार नाही. व्हिडिओमध्ये मुस्कान पुढे म्हणाली ‘मी खूप प्रयत्न केले. सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला. बहिणी, आई-वडील, मैत्रिणी पण सगळे मला उलट समजावतात. आज मी जे करत आहे. मी माझ्या इच्छेनुसार सर्वकाही करत आहे. यात इतर कोणाचाही सहभाग नाही. त्यामुळे मी गेल्यावर कृपया इतर कोणाला दोष देऊ नका. लोक म्हणतात की तुमच्यात आत्मविश्वास नाही. असे सांगितल्यानंतर मुस्कानने संपूर्ण प्रकरण उलटे फिरवले आणि मजेदार मूडमध्ये व्हिडिओ संपवला. पण तिचा हा अखेरचा व्हिडिओ ठरला आहे. पण तिच्या आत्महत्येने बाॅलीवूड हादरले आहे.

फॅशन डिझायनरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहे. मुस्कानने आत्महत्या करण्याआधी सुसाइड नोट लिहिलेली नाही. पोलीस अधिकारी अखिलेश सिंह भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे”. पोलीस आत्महत्येचा कारणाचा शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!