Latest Marathi News
Ganesh J GIF

भिवंडीमध्ये तीन मजली इमारत अचानक कोसळली

ढिगाऱ्याखाली तब्बल ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती, व्हिडिओ समोर, बचावकार्य सुरु

भिवंडी दि २९(प्रतिनिधी)- भिवंडीच्या (वळपाडा) परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. कैलासनगर येथे वर्धमान कंपाऊंड मध्ये ही दुर्घटना झाली आहे.

भिवंडी शहरातील वलपाडा परिसरात एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५० ते ६० जण या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर या विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले आहेत. ग्राउंड फ्लोअर आणि दोन मजले अशी इमारत होती. अग्निशमन वाहने आणि एनडीआरएफ, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. भिवंडी अग्निशामक दालाच्या जवानांनी तेथील ढिगारा हटविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. आतापर्यंत इमारतीत अडकलेल्या एकाही व्यक्तीला बाहेर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे जिवीतहानीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ढिगार्‍याखालून एक महिला आणि लहान बाळाला बचाव पथकाने नुकतेच सुखरुप बाहेर काढले आहे. मात्र, अद्यात ढिगार्‍याखाली ३० ते ३५ जण अडकल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने खबरदारी म्हणून ठाण्यातून सात ते आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

इमारत कशामुळे कोसळली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या येथे मदतकार्य सुरू आहे. भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ढिगाऱ्याखालून काढण्यात येणाऱ्या नागरिकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष करण्याचे आदेश देताना, जिल्हा रुग्णालयातही एक कक्ष तयार ठेवण्याच्या सूचना ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!