
‘पसंती काहीही असली तरी ती तुमच्या बेडरूमपर्यंत राहिली पाहिजे’
अभिनेत्रीची ती पोस्ट होतेय व्हायरल, वादग्रस्त विषयावर बोलत स्पष्टच म्हणाली....
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बॉलीवूड क्वीन कंगना राणौत चित्रपट आणि अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. ‘समलैंगिक विवाहाला’ कायदेशीर मान्यता देण्यावरून सध्या वाद सुरू आहे. आता कंगना राणौतनेही यावर आपले मत व्यक्त केले आहे.
सुप्रीम कोर्टात समलैंगिक विवाहाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान तिने जेंडर आणि सेक्शुअल प्रेफरन्स यासंदर्भात भाष्य केले आहे. कंगना राणौतने समलैंगिक विवाहाबाबत ट्वीट केले आहे. कंगनाचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे, तुम्ही कोणीही असा, तुम्ही पुरुष/स्त्री/इतर काहीही असा, तुमचे जेंडर काय आहे, याने काही फरक पडत नाही. या जमान्यात आपण अभिनेत्री, दिग्दर्शिका असे शब्द वापरत नाही. त्यांना आपण अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणतो. तुम्ही या जगात काय करत आहात हीच तुमची ओळख आहे, तुम्ही बेडरूममध्ये काय करता याने तुमची ओळख होत नाही. ती स्वतः ग्रामीण भागातील एक स्त्री आहे, जीवनाने तिला कोणतीही सवलत दिली नाही, तिला अभिनेते, चित्रपट निर्माते, निर्माते आणि लेखकांच्या जगात आपले स्थान निर्माण करायचे होते. कंगनाने लागोपाठ तीन ट्वीट केले आहेत. ज्यामध्ये कंगनाने स्वतःला फक्त महिला समजणाऱ्यांना, त्यांनी अशी चूक करू नये, असा सल्ला कंगणाने दिला आहे. त्याचबरोबर माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या बाबतीत असे घडले तर तुम्ही फार पुढे जाणार नाही. लिंगाच्या विचारांपासून मुक्त व्हा असा संदेशही कंगणाने दिला आहे.
Whether you are a man/woman/ anything else your gender is of no consequence to anyone but you, please understand. In Modern world we don't even use words like actresses or female directors we call them actors and directors. What you do in the world is your identity, not what you…
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 28, 2023
तब्बल दीड वर्ष कंगना ट्वीटरपासून लांब होती. गेल्या काही दिवसांपुर्वीच कंगनाने ट्वीटरवर दमदार कमबॅक केले आहे. कंगना रणौत लवकरच ‘इमर्जन्सी’ नावाचा चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.