Latest Marathi News
Ganesh J GIF

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाजले

एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये वादाची ठिणगी? सरकार अस्थिर?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- आमच एकमताच ईडी सरकार म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली आहे. पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यावेळी विविध बदल्यावर चर्चा झाली. विशेषतः पोलिस बदल्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यावर दोघांमध्ये मतभेद झाले. राज्यात शिंदे सरकार येऊन शंभर दिवस लोटले असूनही, बदल्यांचा विषय मार्गी लागलेला नाही. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नाराजी व्यक्त केली.त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या वेळा पाळत नाहीत. त्यामुळेही फडणवीसांची नाराजी व्यक्त केली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस जोडी प्रत्येक कार्यक्रम, बैठकीत झळकायची. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांनी एका व्यासपीठावर येणे टाळल्याचे दिसते आहे. तेंव्हापासून या दोघांमध्ये काही बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील पोलिस भरती हा राज्याच्या राजकारणातील महत्वाचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या काळात देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद झाले होते.आता फडणवीस यांचा वावर सुपर सीएम सारखा आहे. हे शिंदे यांना खटकत आहे. त्यामुळे शिंदे नाराज आहेत.त्यामुळे सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!