Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे: ‘ती निव्वळ अफवाच’; ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाचा न्यायालयात अजब दावा

पुणे जिल्ह्यासह अकोला, सोलापूर येथील अल्पवयीन मुली आणि मुलावरील अत्याचाराच्या घटनेनं राज्यात संतापाची लाट पसरली आहे. नसरापूरची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली.65 वर्षीय आजोबाने आपल्या अल्पवयीन नातीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. पीडित चिमुरडीचा रडण्याचा, ओरडण्याचा आवाजल पत्र्याच्या खोलीतून बाहेर गेला त्याचवेळी तिथून जात असलेल्या एका महिलेने तो आवाज ऐकला आणि त्या घराकडे धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेवरून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत मध्यरात्री १ वाजेपर्यंत रास्ता रोको केला होता. या प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला काल कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी नराधम आजोबाने ‘मी नातीसोबत बसलो असता, त्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवलील असं त्याने कोर्टात सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

मी नातीसोबत बसलो होतो; महिलेने अफवा पसरवली
आरोपी आजोबाला कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला विचारले की, तुला कोणत्या कारणासाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे, याची माहिती आहे का?, त्यावर आरोपीने म्हटलं की, ‘मी नातीसोबत बसलो असता, शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली, असे निर्लज्जपणे उत्तर दिले. पर्वती येथे स्वतःच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील या आजोबाला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि. ८) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.नात्याने आजोबा असलेल्या आरोपीने मुलीला खोलीत बोलावलं तिला निर्वस्त्र करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी कोर्टामध्ये दिली. दरम्यान, आरोपीच्या छातीवर मुलीच्या नखांचे ओरखडे आणि ओठांवर चावल्याचे व्रण उमटल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीची बलात्काराच्या गुन्ह्याच्या संबंधाने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. त्याने अशा प्रकारचे कृत्य इतर कोणासोबत पूर्वी केले आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे. आरोपीने यापूर्वी मुलीशी अशा प्रकारचं काही कृत्य केले आहे का, याबाबत तपास करण्यात येत आहे. पुढील तपासासाठी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला. न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?
पर्वती पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक राजेंद्र सहाणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. काल (5 मे) रात्री 9.30 वाजता एक माहिती मिळाली की, एका आरोपीला लोकांनी पकडून ठेवलं होतं ज्याने स्वत:च्या नातीवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केला. हा त्या मुलीचा सख्खा आजोबा आहे, जो 70 वर्षांचा आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाची प्रकृती चांगली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे. सध्या परिस्थिती शांत आहे . पुढील कारवाई आम्ही करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!