Latest Marathi News
Ganesh J GIF

सोमवार पुण्यासाठी ठरला अपघातवार, दोन भीषण अपघात

भररस्त्यात होर्डिंग कोसळून सात जण ठार, तर नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यातील किवळे येथील कात्रज-देहुरोड सर्व्हिस रस्त्यावरील टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये सात जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत, तर नवले पुलावर देखील अपघात झाला आहे. त्यामुळे सोमवार पुणेकरांसाठी अपघातवार ठरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अवकाळी पाऊस कोसळत आहे. आजही अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे काही नागरिकांनी होर्डिंगच्या जवळ असलेल्या पंक्चरच्या दुकानात थांबले होते. पण त्यावेळी त्यावर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला. या घटनेची तातडीने माहिती मिळताच घटनस्थाळी पोलीस, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकून पडल्याची भीती वर्तवली जात आहे.सायंकाळी किवळे येथे होर्डिंग पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रावेत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन कटरच्या साह्याने होर्डिंग तोडले. तसेच जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिली आहे. सायंकाळी आलेल्या वादळामध्ये शहरात अन्य ठिकाणी देखील होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. निगडी मधील ओटास्कीम येथे देखील वादळात होर्डिंग आणि सिग्नलचा खांब कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

दुसरीकडे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी संध्याकाळी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गावर खोबरे तेलाने भरलेला कंटेनर उलटला. त्यामुळे हजारो लिटर तेलाची गळती रस्त्यावर झाल्याने महामार्ग निसरडा बनला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!