Latest Marathi News
Ganesh J GIF

या आक्रमक महिला खासदारची खासदारकी रद्द होणार?

लोकसभेच्या या समितीची महत्वाची बैठक, खासदारांच्या अडचणीत मोठी वाढ, या प्रकरणामुळे महिला खासदार अडचणीत?

दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या प्रकरणात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर रोज नवीन आरोप करण्यात येत आहेत. त्याचबरोबर आता मोईत्रा यांची खासदारकी देखील रद्द होण्याची शक्यता आहे. कारण मी केलेल्या तक्रारीच्या आधारावर लोकपालांनी महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजपा खासदार निशिकांत दुबेंनी दिली आहे.

खासदारा महुआ मोईत्रा यांच्या खासदारकीवर आज महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या पोर्टलवर दुबईतून लॉगिन, पैसे घेऊन अदानींवर प्रश्न विचारल्याचे आरोप आदी गोष्टींमुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. लोकसभेच्या एथिक्स कमिटीची आज बैठक होत आहे. सभापती विनोद सोनकर हे या बैठकीतील त्यांच्या खासदारकीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर जो प्रस्ताव असेल तो मतदानानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवला जाणार आहे. खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात घेऊन समितीने त्यांचे वर्तन आक्षेपार्ह आणि अनैतिक असल्याचे म्हटले आहे. त्याआधारे ही समिती आपल्या अहवालात महुआचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करणार आहे. दरम्यान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला होता की, महुआ मोईत्रा यांनी लॉग-इन पासवर्ड दर्शन हिरानंदानी नावाच्या व्यक्तीला दिला, ज्याद्वारे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संदर्भातील प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आले. याबाबत दुबेंनी आयटी मंत्र्यांकडे तक्रार केली होती.

महुआ मोईत्रा ह्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. आपल्या भाषणामुळे देखील महुआ मोईत्रा ओळखल्या जातात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!