Latest Marathi News
Ganesh J GIF

रमेश बैस यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

राजभवनात पार पडला सोहळा, या भाषेत घेतली शपथ, या नेत्यांची उपस्थिती

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी त्यांना पदाची शपथ दिली.

रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. विशेष म्हणजे बैस यांनी मराठीतून शपथ घेतली आहे.राजभवनातील दरबार हॉल येथे समारंभपूर्वक शपथ सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. रमेश बैस हे राज्याचे १४ वे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत. येणाऱ्या काळात नव्या राज्यपालांची भूमिका काय असेल हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी बैस यांचे काल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान शपथविधीवेळी राजभवन परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रमेश बैस हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांचा नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास राहिला आहे. ते सातवेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. शिवाय त्यांनी केंद्रात विविध खात्याचा कारभार सांभाळला आहे. तसेच ते हातखंडा सरकार सोबतच्या वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!