ये मावशे गप्प बस’ म्हणत रावसाहेब दानवेंनी जोडले हात
दानवे पुन्हा चर्चेत, व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल
ओैरंगाबाद दि २२(प्रतिनिधी)- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी एक वेगळाच प्रसंग पहायला मिळाला. बैठकीदरम्यान एक महिला आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी दानवेंनी चक्क त्या महिलेला हात जोडत शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे एकच हशा पिकला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये सुरुवातीला एका महिलेचा आवाज येतो. ती महिला आपली समस्या दानवे यांच्यासमोर मांडत असते. महिला म्हणते मला बोलण्याचा अधिकार आहे. मला बोलू द्या. मात्र, यावेळी रावसाहेब दानवे या महिलेला म्हणाले, की ‘ये मावशी थांब तुझ्या पाया पडू का?’ मात्र ही महिला शेवटपर्यंत आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न करतच राहिली. रावसाहेब दानवेंच्या या प्रश्नावर उत्तर देताना महिला म्हणाली, ‘माझ्या पाया पडू नका, तुम्हीच आमच्यासाठी मायबाप आहे. या खुर्चीवर आमच्यासाठीच बसला आहात. आम्हाला न्याय द्या.’असे म्हणत दानवेंच्या विधानावर कोट केला. पण महिलेला उत्तर न देता हात जोडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दानवेंचा व्हिडिओ चांगलच व्हायरल झाला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे अनेकदा विविध कारणांनी चर्चेत येत असतात. कधी ते चहा बनवत असतात, तर कधी देवेंद्र फडणवीसांच्या गाडीला गर्दीतून वाट करून देत असतात. तसेच आत्ताही त्यांचा हात जोडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.