Latest Marathi News
Ganesh J GIF

रावसाहेब दानवेंचे जावाई हर्षवर्धन जाधवांचा बीआरएस पक्षात प्रवेश

कन्नड विधानसभेत रंगणार पती पत्नीत राजकीय सामना, संजना जाधव देणार पतीला आव्हान

छत्रपती संभाजीनगर दि २४(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचे जावाई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादेत भेट घेवून थेट त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या भारत राष्ट्रीय समिती पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत.

हर्षवर्धन जाधव यांचा हा तिसरा पक्ष प्रवेश आहे जाधव सुरूवातीला मनसेत होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर आता हर्षवर्धन यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या पक्ष प्रवेशाविषयी बोलताना हर्षवर्धन जाधव म्हणाले की, “तेलंगाणा राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुरू असणाऱ्या योजना त्यासाठी करण्यात आलेली तरतूद पाहून हे विकास प्रारुप महाराष्ट्रासाठी योग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला.” असे सांगितले आहे. यावेळी येत्या २६ ऑगस्टच्या लोहा येथील सभेला उपस्थित राहणार असून शेतकरी व शेतीप्रश्नावर राज्य सरकारच्या धोरणावर बोलू.’ असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. यावेळी जाधव यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरेंचे चिन्ह ज्या दिवशी काढून घेतले, त्यादिवशी मी खूप भावूक झालो. मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. पण ‘नॉट इंटरेस्टेड’ असा प्रतिसाद आल्याचे जाधव म्हणाले आहेत. यावेळी बीआरएस पक्षाने सांगितल्यास कन्नड विधानसभा आणि जालना लोकसभा लढवणार. पक्ष जो सांगेल ते लढवणार असल्याचे  हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये टॅक्ट्रर चिन्हावर दोन लाख ८३ हजार ७९८ मते मिळविणारे हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैरेंच्या पराभवात महत्वाची भुमिका पार पाडली होती. त्यामुळे खासदार म्हणून एमआयएमचे इम्तियाज जलील २०१९ मध्ये निवडून आले होते.

हर्षवर्धन जाधव हे भाजपाचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचे जावाई आहेत. विशेष म्हणजे रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर संजना या कन्नड मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक तसेच कन्नड विधानसभा निवडणूक रंगतदार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!