Just another WordPress site

‘रश्मी वहिनींनी संजय राऊतांना प्रसाद दिला होता’

शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचा दावा, त्या बाबतीत अजित पवारांबाबत सुचक दावा

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहचली असताना, दुसरीकडे राज्याच्या राजकरणात पुन्हा एकदा पहाटेच्या शपथ विधीवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.दरम्यान यावरूनच संजय राऊत यांच्यावर आरोप करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

GIF Advt

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी म्हणजेच रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांना प्रसाद दिला होता असा दावा शिरसाट यांनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबत मातोश्रीच्या ऑपरेटर तर किचनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असल्याच देखील शिरसाट म्हणाले आहेत. पहाटेच्या शपथ विधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती याबाबत ठाकरे कुटुंबातील कोणाला कळाले होते का? या प्रश्नावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, याबाबत उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी यांना माहिती होती. परंतु परिस्थितीमुळे काहीही बोलता आले नव्हते. मात्र त्यावेळी जे काही घडलं ते सर्व काही आता सांगू शकत नाही, पण संजय राऊत यांना चांगलाच प्रसाद दिला होता आणि तो प्रसाद संजय राऊत यांना चांगला माहित आहे. विशेष म्हणजे याबाबत अख्ख्या मातोश्रीला माहित आहे. ऑपरेटरपासून तर सर्व पीए आणि किचनमध्ये काम करणाऱ्यांपर्यंत सर्वांना माहित आहे. पण यावर आता भाष्य करणे योग्य नाही. असे देखील शिरसाट म्हणाले आहेत. त्याचबरोबर संजय राऊत विश्वास ठेवण्यायोग्य व्यक्ती नाही तरीही संजय राऊतांवर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला आहे. असेही शिरसाट म्हणाले आहेत.

पहाटेच्या शपथ विधीची सर्व माहिती संजय राऊत यांना होती. त्यामुळे यावर आज संजय राऊत कोणतेही प्रतिक्रिया देत नाही. याबाबत जर अजित पवार बोलले तर बॉम्बस्फोट होईल. कारण अजित पवार हे फार स्पष्ट बोलणारे नेते आहे. त्यामुळे यावर त्यांनी वक्तव्य केल्यास राज्याच्या राजकारणात बॉम्बस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.असे म्हणत शिरसाट यांनी सस्पेन्स वाढवला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!