Latest Marathi News
Ganesh J GIF

दिरासोबतच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा

क्रूरतेचा कळस गाठत पतीला संपवल, पोलीसांनी ठोकल्या बेड्या

अकोला दि १५(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात धुराच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू असल्याचे दोघांनी भासवले. पण त्यांचं बिंग अखेर २५ दिवसांनी शवविच्छेदनातून फुटले, आणि हत्या समोर आली. त्यानंतर पोलीसांनी कारवाई केली आहे.

अकोला शहरातील खडकी परिसरातील म्हाडा कॉलनीत रहिवासी असलेले आकाश इंदोरे याला त्याच्या पत्नीनं २० नोव्हेंबरला प्रकृतीत बिघाड झाल्याने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणात खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पत्नीनेही पतीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या असे सांगत पतीचा मृत्यु अकस्मात असल्याचे भासवले.पण पोलिसांना आकस्मिक मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय आला. त्यांनी धागेदोरे शोधले असता, मृताच्या पत्नीचे म्हणजेच दिव्याचे पतीच्या मावस भावासोबत सूत जुळले असल्याचे समोर आले.तसेच शवविच्छेदनाचा अहवालातही इंदोरे याचा मृत्यू हा आकस्मिक नसून त्याची गळा आवळून हत्या केल्याचं समोर आले. या प्रकरणात खदान पोलिसांनी आरोपी पत्नी व मृताच्या मावसभावास अटक केली आहे.

दिव्या आणि अजय माजरे यांच्या अनैतिक संबंधांमध्ये पती अडसर ठरू लागल्याने पतीची गळा आवळून हत्या केली. दरम्यान अटक केलेल्या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं या दोघांनाही १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!