Latest Marathi News
Ganesh J GIF

एक पॉर्नस्टार अभिनेत्री चालते पण अभिनेत्रीची बिकीनी..

बिकिनीच्या वादावरुन या अभिनेत्रीने साधला सनी लिओनीवर निशाणा

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आणि त्यातील नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बेशरम रंग’ हे गाणं चांगलेच चर्चेत आहे. दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.या गाण्याविरोधातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. यामुळे ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंडही सोशल मीडियावर व्हायरल होत असताना बाॅलीवूडमधील एका अभिनेत्रीने चित्रपटाचे समर्थन करताना वादग्रस्त विधान केले आहे.


अभिनेत्री पायल रोहतगी हिने मात्र वेगळंच विधान करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती म्हणाली  “माझ्यामते हे आरोप अत्यंत बिनबुडाचे आहेत. एखाद्या रंगाला उद्देशून वाद निर्माण करणं चुकीचं आहे, दीपिकाच्या बिकिनीवर कोणत्याही सनातन धर्मातील देवी देवतांचे फोटो नाहीयेत. केवळ एका विशिष्ट रंगावरून एखाद्या कलाकृतीला विरोध कसा करता येऊ शकतो? जर दीपिका या गाण्यात तुम्हाला अश्लील वाटत असेल तर मग आपल्याच देशात पॉर्नसारखी गोष्ट तुम्ही कशी सहन करता? इथे आपल्या मनोरंजनसृष्टीत तर एका पॉर्नस्टारला अभिनेत्रीचा दर्जा दिलेला आहे. तिचा उदोउदो आपण करतो असतो. हा दुटप्पीपणा थांबवला पाहिजे. उगाचच भगव्या रंगाचा आधार घेऊन या वादाला आणखी मोठं होण्यापासून रोखलं पाहिजे.” असे म्हणत सनी लियाॅनीवर निशाना साधला आहे.


पठाण चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.पण प्रदर्शनाआधीच चित्रपट वादात सापडला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही चित्रपटाला विरोध केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!