Just another WordPress site

ऋतुराज गायकवाडने एका षटकात लगावले सात षटकार

एका सामन्यात रचले पाच रेकाॅर्ड, बघा सात सिक्सचा व्हिडिओ

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत एकाच षटकात सलग ७ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध ही कामगिरी केली आहे. याबरोबरच या सामन्यात त्याने द्विशतकही झळकावले आहे.

डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग डावातील ४९ वे षटक टाकत होता. त्याने ५वा चेंडू नो बॉल टाकला. यावरही ऋतुराजने षटकार ठोकला. अशाप्रकारे, त्याने एकाच षटकात ७ षटकार लगावत एकूण ४३ धावा केल्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका षटकात ७ षटकार लगावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. ऋतुराज सध्या दमदार लयीत आहे. त्याची हीच लय उत्तर प्रदेशविरुद्धही कायम राहिली. त्याने या सामन्यात एकूण १५९ चेंडूत २२० धावा केल्या. या खेळीत त्याने १६ षटकार आणि १० चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त महाराष्ट्राकडून या सामन्यात अंकित बावणे आणि अझिम काझीने प्रत्येकी ३७ धावांची खेळी केली. त्यामुळे महाराष्ट्राने ५० षटकांत ५ बाद ३३० धावा केल्या.

GIF Advt

या स्पर्धेतील शेवटच्या ८ डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे. युपीकडून कार्तिक त्यागी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६६ धावांत ३ बळी घेतले.गायकवाडने आजच्या सामन्यात इतिहासातील ५ मोठे रेकॉर्ड तोडले. लिस्ट ए क्रिकेट मॅचमध्ये एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संयुक्तपणे तो पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. रोहितने सुद्धा एका इनिंगमध्ये १६ षटकार लगावले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!