Latest Marathi News
Ganesh J GIF

रोडरोमिओने तरुणी महिलांनी छेडले, पण…

रोड रोमिओच्या त्रासाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, बघा नेमक काय घडल?

अहमदाबाद दि ८(प्रतिनिधी)- राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. विशेष करुन शाळा काॅलेजला जाणाऱ्या मुलींना रोडरोमिओ फार त्रास देत असतात. सध्या गुजराथमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

महिला, मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुजरातमधील अशाच एक घटनेचा व्होडका व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दिसत आहे की एक तरुण स्कूटीवरून जाताना रस्त्यावर दिसेल त्या तरुणीला आणि महिलांना शिवीगाळ करत होता. पण त्याला कोण काहीच बोलत नव्हते. पण या तरूणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. याची दखल गुजरात पोलीसांनी घेतली. आणि तरुणाला चांगलाच धडा शिकवला. पोलीसांनी त्याची धुलाई करत त्याच रस्त्यावरून धिंड काढली आणि त्याला माफी मागायला सांगितली. सध्या दोन्ही बाजू दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईचे दॆखील नागरिकांनी काैतुक केले आहे.

हा व्हिडीओ @gharkekalesh या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्हूज आणि लाईक्स मिळत आहेत. दरम्यान अनेकांनी तरुणाच्या वागणूकीवर संताप व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!