Latest Marathi News

डोबींवली रेल्वे स्थानकात सर्वांसमोरच तरुण – तरुणीचा रोमान्स

रोमान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, नागरिकांची नाराजी

डोंबिवली दि २०(प्रतिनिधी)- रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे. त्याचप्रमाणे ती अन्य उपनगरांचीही लाईफलाईन आहे. पण त्याच रेल्वेच्या रेल्वे स्टेशनवर एका कपलचा किसिंग सिन व्हायरल झाला आहे. डोबींवली रेल्वे स्टेशनवरील हा प्रकार घडला आहे. यावेळी तिथ सारेच आवक झाले होते.

डोंबिवली रेल्वे स्थानक हे प्रवाशांनी नेहमीच गजबजलेले असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी एका तरुण-तरुणीचे अश्लिल चाळे सुरु होते. स्टेशनवरच्या एका प्रवाशाने त्यांचे हे अश्लील चाळे मोबाईल कॅमेरात कैद केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही प्रवाशांनी त्या दोघांना विरोध केल्यानंतर ते तिथून निघून गेले. पण यानंतर त्यांनी तोच प्रकार सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर सुरु केला. रेल्वे पोलिसांनी याची दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करणं चुकीचं असून त्या दोघांविरोधात एनसी नोंदवली असल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. तर नागरिकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. पण सध्या सोशल मीडियावर कपलच्या नॉनस्टॉप किसिंगचा सपाट्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.

रेल्वेत हाणामारी झालेले व्हिडीओ या आधी अनेकदा व्हायरल झाले आहेत. कधी पुरूषांमध्ये तर कधी महिलांमध्ये असे प्रकार घडले आहेत. पण तरुण तरूणीचा अश्लील चाळे करण्याचा व्हिडिओ पहिल्यांदाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे रेल्वे पोलीसांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!